नरेंद्र मोदी सच्चे संत; केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची स्तुतिसुमने

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मानवकल्याणाचा ध्यास घेतलेले सच्चे संत आहेत. लोकशाही आणि आर्थिक विकासाची फळे तळागाळातील गरीबांपर्यंत पोहोचण्यासाठी ते झटत आहेत, अशी स्तुतिसुमने केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी आज मोदींवर उधळली. ते एका शासकीय परिषदेत बोलत होते.

विकास विशेषतः आर्थिक विकास हा सर्वंकष आणि सर्वसमावेश असला पाहिजे. त्यासाठीच मोदी सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ हे घोषवाक्य समोर ठेवून काम करीत आहे असे त्यांनी सांगितले. समाजातील पददलित आणि उपेक्षित समाजावर पंतप्रधानांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असेही शर्मा म्हणाले.