मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…, शपथविधी 30 मे रोजी?

narendra-modi-oath

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत नरेंद्र मोदी आता सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होणार आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा 30 मे रोजी पार पडण्याची शक्यता आहे.

निवडणूक निकालात एनडीएला 348 जागांवर मोठे यश मिळाले. तर एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा मोदींच्या नावाची मोहर उठली आहे. मोदींचा शपथविधी गुरुवारी, 30 मे रोजी पार पडणार अशी चर्चा आहे. 2014 मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी अत्यंत भव्य समारंभ करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमासाठी ‘सार्क’ मधीलच्या देशांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आले होते. ज्यामध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचा देखील समावेश होता. त्यामुळे यंदा होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली असून या सोहळ्यात कोणकोण सहभागी होणार अशी चर्चा सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या