‘फोन पे लोन’ ही यूपीए सरकारचीच देणगी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फोनवरून लोन या काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या भ्रष्टाचारामुळे देशात बँकांकडील थकीत कर्जे वाढली आहेत, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच नामदारांच्या (नेत्यांच्या) आदेशावरून कर्ज म्हणून दिलेली पै न् पै वसूल केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पोस्टातर्फे सुरू केलेल्या पेमेंटस् बँकेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते आज येथे तालकटोरा स्टेडियममध्ये करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. देशात 12 मोठय़ा थकबाकीदारांकडे पावणेदोन लाख कोटी, 27 थकबाकीदारांकडे 1 लाख कोटींचे कर्ज थकले आहे. आम्ही यातील एकालाही कर्ज दिलेले नाही, असे मोदी म्हणाले.