नरेंद्र मोदी पुन्हा जिंकले तर निवडणुका बंद होतील – काँग्रेस

सामना ऑनलाईन । जयपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यामुळे जर ते पुन्हा निवडून आले तर निवडणुका बंद होतील, असा गंभीर आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. राजस्थानमधील श्रीडूंगरगढ येथे प्रचार सभेत त्यांनी हा आरोप केला आहे.

‘भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लोकशाहीत विश्वास नाही. ते दोघेही त्यांच्याविरोधातील विचार सरणी सहन करू शकत नाही. लोकशाहीत विरोधक काय बोलतात त्याचा सन्मान केला गेला पाहिजे असे गांधीजींनी सांगितले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व संघाची लोकं विरोध सहन करू शकत नाही. लोकशाहीचा मुखवटा घालून भाजप व मोदी राजकारणात आलेयत. त्यामुळे जर मोदी हे पुन्हा निवडणूक जिंकले तर लक्षात ठेवा पुन्हा निवडणुका होतीलच का याची काही शाश्वती नाही’, असे गेहलोत यांनी यावेळी सांगितले.