खरंच, एलियन आहेत…!

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

बॉलीवूडपटात वावरणारा एलियन खरंच पृथ्वीवर अवतरला तर यात काही नवल वाटायला नको. कारण नासाच्या वैज्ञानिकांनी एलियन अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे. सौरमालेबाहेरील २० नव्या ग्रहांचा शोध या वैज्ञानिकांनी हाती घेतलेल्या ‘के २’ मिशनद्वारे लावण्यात आला असून या ग्रहांवर एलियनचा वावर असू शकतो, यावर वैज्ञानिक ठाम आहेत.

नासाच्या केपलर टेलिस्कोपमधून मिळालेल्या डाटानुसार सौरमालेबाहेर असलेल्या या ग्रहांवर एलियन राहत असल्याचे सिद्ध झाले आहे. या संशोधनानंतर नासाचे वैज्ञानिक खूपच आनंदीत आहेत. के२ मिशनशी संबंधित जेफ कॉगलिन यांनी या मिशनविषयी सांगितले,‘या २० ग्रहांपैकी काही ग्रह आपल्या सूर्यमालेतील ग्रहांप्रमाणेच असून ते स्वतःभोवती परिक्रमा करतात. काही ग्रह पृथ्वीप्रमाणे ३९५ दिवस एवढय़ा कालावधीत एक परिक्रमा पूर्ण करतात. तर काही ग्रहांना परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी म्हणजेच १८ दिवसांचा वेळ लागतो.’

नासाच्या न्यू सायंटिस्ट रिपोर्टनुसार

  • या मिशनमध्ये सापडलेल्या एका ग्रहाला आम्ही ‘केओआय ७९२३.०१’ हे नाव दिले असून हा ग्रह पृथ्वीच्या ९७ टक्के आकाराप्रमाणे आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा थंड असून या ग्रहांचा सूर्याप्रमाणे असलेला ग्रहही थंड आहे.
  • पृथ्वीवर टुंड्रा प्रदेश नावाचा भाग अस्तित्वात आहे. हे ग्रह या टुंड्रा प्रदेशाप्रमाणे असल्याचे निरीक्षण नासाने नोंदविले आहे. या ग्रहावर पाणी असू शकते.
  • नासाच्या संशोधनात सापडलेले २० ग्रह हे खरेच ग्रह असल्याची ७० ते ८० टक्के शक्यता आहे. पण या ग्रहांची १०० टक्के खात्री करून घेण्यासाठी नासाला आणखी माहितीची गरज भासणार आहे.