धुळीच्या वादळामुळे ‘नासा’च्या मंगळयानाचा संपर्क तुटला

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

मंगळ ग्रहावरील धुळीच्या वादळामुळे तिथे संशोधन करत असलेल्या ‘नासा’च्या ‘अपॉर्च्युनिटी रोव्हर’ या अंतराळयानाशी गेल्या दोन महिन्यांपासून संपर्क तुटला आहे. या यानाशी संपर्क प्रस्थापित करण्याचे ‘नासा’चे प्रयत्न सुरू आहेत. ‘अपॉर्च्युनिटी रोव्हर’ हे यान गेली 14 वर्षे मंगळावर संशोधन करत आहे. धुळीच्या वादळामुळे सौरऊर्जेची निर्मिती करू न शकल्याने या यानाचे कार्य आपत्कालीन परिस्थितीत बंद करावे लागले होते. तेव्हापासून ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ आठवडय़ातून तीन वेळा या यानाला संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. या यानाशी शेवटचा संपर्क 10 जून रोजी झाला होता. सप्टेंबर महिन्यात मंगळावरील धुळीचे वादळ शांत होण्याचा अंदाज असून त्यानंतर हे यान स्वतःची यंत्रणा पुन्हा रिचार्ज करू शकेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.