क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या हस्ते नाथ प्रतिष्ठानच्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन


सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पद्दविभुषन खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिध्द क्रिकेटपट्टु सुरेश रैना यांच्या हस्ते तर धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता वैद्यनाथ महाविद्यालया समोरील प्रांगणात होणार आहे.

या स्पर्धेसाठी शहर व ग्रामीणसाठी स्वतंत्र बक्षीसे असुन शहरातील संघांचे सामने शहरातील संघासोबतच तर ग्रामीण भागातील संघांचे सामने ग्रामीण भागातील संघासोबतच होणार आहेत. या स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व संयोजक अजय मुंडे यांनी केले आहे.