राष्ट्रीय बॅडमिंटन : फायनलमध्ये ‘फुलराणी’ची सिंधूवर मात

सामना प्रतिनिधी । नागपूर

हिंदुस्थानची ‘फुलराणी’ ऑलिम्पिक कास्यपदक विजेती साजन नेहवालने ८२व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही सिंधूनवर विजय मिळवत विजेतेपद पटकावले आहे. फायनलमध्ये सायनाने अटीतटीच्या झालेल्या सामन्यात सिंधूवर २१-१७, २७-२५ अशा फरकाने मात केली. सायनाचे हे तिसरे राष्ट्रीय विजेतेपद आहे.

राष्ट्रीय बॅडमिंटन: प्रणॉय राष्ट्रीय चॅम्पियन, श्रीकांतचा धक्कादायक पराभव

दोन दिग्गज खेळाडूंमध्ये सामना होणार म्हणजे तो रंगतदारच असणार या आशेवर मैदानात हजेरी लावलेल्या प्रेक्षकांना सायना आणि सिंधूने निराश केले नाही. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचा अंदाज घेत खेळे केला. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाकडे ११-९ अशी आघाडी होती. त्यानंतर सिंधूने सायनाला जोरदार प्रतिकार परत सेटमध्ये परत येण्याचा प्रयत्न केला. मात्र सायनाच्या जोरदार खेळापुढे तिला हार मानावी लागली आणि पहिला सेट तिने २१-१७ने गमावला.

पहिला सेट गमावल्यानंतर सिंधूने दुसऱ्या सेटमध्ये सायनासोबत तुल्यबळ खेळ केला. सेटच्या सुरुवातीपासून दोन्ही खेळाडूंमध्ये एका एका गुणासाठी जोरदार टक्कर पाहायला मिळाली. कधी सिंधू आघाडीवर तर कधी सायना आघाडीवर. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सायनाने जिगरी खेळ करत तिला १८-१८ असे गाठले. त्यानंतर सुरू झाले विजेतेपदाचे द्वंद्व. मात्र सायनाने आपल्या अनुभवाच्या जोरावर सिंधूचा २७-२५ अशा फरकाने पराभव करत सामनाही जिंकला.