‘नॅशनल क्रश’ प्रियाचा आनंद गगनात मावेना…

सामना ऑनलाईन । कोच्ची

भूवयांची कसरत करुन रातोरात सुपरस्टार झालेली ‘नॅशनल क्रश’ ची लोकप्रियता दिवसोंदिवस वाढत चालली आहे. प्रियासाठी शुक्रवारची रात्र विशेष संस्मरणीय ठरली. कोच्चीमध्ये झालेल्या इंडियन सुपर लिग स्पर्धेदरम्यान प्रियाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली.

प्रिया आणि तिचा ‘उरु आदर लव’ या सिमेमातील सहकारी रोशल अब्दुल्ला हे दोघे जण कोच्चीमधील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर पिवळ्या जर्सीमध्ये आले होते. केरळ ब्लास्टर या आपल्या आवडत्या टिमला त्यांनी यावेळी पाठिंबा दिला. सचिन तेंडुलकर आणि अभिषेक बच्चनला भेटून आपण खूप आनंदी झाल्याचे तिने सांगितले. यावेळी तिचा लहान भाऊही उपस्थित होता. आपल्याला झालेल्या आनंदाचा व्हिडीओही तिने शेअर केला आहे.

सचिन तेंडुलकर मॅच बघत असल्याचा फोटो देखील प्रियाने शेअर केला आहे.

sachin-kochhi