मातोश्रीवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते

मातोश्री निवासस्थानी चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश म्हापुस्कर, सुनील सुकथनकर, संदीप पाटील, रामेश्वर भगत, अलोक डे, सचिन लोवलेकर, निखिल मुसळे, कल्पना कोठारी यांनी  शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला. या प्रसंगी सोबत शिवसेना सचिव आदेश बांदेकर ,सुशांत शेलार उपस्थित होते. (सर्व छायाचित्रः राजेश वराडकर)