नराधमांवर कारवाई कधी? साता समुद्रापारवरून मोदींवर प्रश्नांचा मारा

modi-in-tension

सामना ऑनलाईन । लंडन

उत्तरप्रदेश, जम्मू-कश्मीर आणि बिहारमधील बलात्कारांच्या घटनांनी देशभरात संतापाचे वातावरण असतानाच आता याचं पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. या प्रकरणी विरोधकांनी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला घेरले आहे. आता लंडनमधील भारतीय छात्र संघटनेनेही मोदींना पत्र पाठवत हिंदुस्थानात झालेल्या तीन अल्पवयीन मुलींवर घृणास्पo कृत्याप्रकरणी आरोपींवर कारवाई कधी केली जाईल आणि पीडितांना योग्य न्याय कधी मिळेल? असा प्रश्न विचारला आहे.

पंतप्रधान मोदी १७ एप्रिल २०१८ ला लंडन दौऱ्यावर जाणार आहे. याठिकाणी ते कॉमनवेल्स समीटमध्ये सहभागी होतील. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी ब्रिटनच्या नॅशनल इंडियन स्टुडंट अॅन्ड एलुमिनाईद्वारे मोदींना एक पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात लिहिले आहे की, ‘देशाला संबोधित करताना तुम्ही (पंतप्रधान मोदी) या प्रकरणी न्याय मिळवून देऊ असे म्हटले आहे. तुमच्या या वक्तव्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु पीडित मुलींना न्याय कधी आणि कसा मिळेल? असा आमचा पंतप्रधानांना प्रश्न आहे.’ टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या पत्राची एक प्रत ब्रिटेनमधील हिंदुस्थानी दूतावासाकडे पाठवण्यात आली आहे.

या पत्रामध्ये कठुआ येतील अल्पवयीन मुलीवर गँगरेप आणि हत्या, उन्नाव येथील गँगपेरप्रकरणी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आले आहे. हे पत्र एनआयएसएयू (NISAU), ऑक्सफोर्ड इंडिया सोसायटी, केसीएल इंडिया सोसायटी, एलएसई एसयू (LSE SU) इंडिया सोसायटी, वॉरविक इंडियन सोसायटी, भारत परिवार यूओबी (UoB), इंडियन सोसायटी, इंपीरियल कॉलेज इंडियन सोसायटी, यूसीएल (UCL) इंडिया सोसायटी, एनटीएसयू (NTSU) इंडियन सोसायटी, क्वीन मैरी इंडियन सोसायटी यांच्या हवाल्याने पाठवण्यात आले आहे.