‘ही’ अभिनेत्री मायकल जॅक्सनसारखी का दिसायला लागली?


सामना ऑनलाईन । मुंबई

अधिकाधिक चांगले दिसण्यासाठी बऱ्याचदा अभिनेत्री त्यांच्या चेहऱ्यावर कॉस्मेटीक सर्जरी करत असतात. मात्र काही अभिनेत्रींच्या बाबतीत या शस्त्रक्रियांचा परिणाम उलट झाल्याची देखील उदाहरणं आहेत. असंच एका प्रसिद्ध अभिनेत्रीला चेहऱ्यावर कॉस्मेटीक सर्जरी करणे चांगलेच महागात पडले असून ही अभिनेत्री चक्क मायकल जॅक्सन सारखी दिसायला लागल्याची चर्चा रंगली आहे. कुसुम या प्रसिद्ध मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री नौशिल अली सरदार हीला सध्या तिच्या नव्या लूक वरून सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

nausheen-ali-sardar

मी अँजेलिना होण्याच्या प्रयत्नात…

हलक्या सावळ्या रंगाची, गोल चेहरा, बोलके डोळे, गोड हास्य असणारी नौशिन ही तिच्या कुसुम मालिकेतील भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती. कुसुमच्या साधेपणामुळे नौशिन घराघरात पोहोचली होती. जवळपास दहा बारा वर्षांनंतर नौशिनने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. मात्र तिचा नवीन लूक पाहून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. नौशिनचा आताचा लूक पूर्णपणे बदलेला असून तिला ओळखणे देखील कठिण झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. नौशिनने तिच्या नाकावर व ओठांवर कॉस्मेटिक सर्जरी केल्याचे बोलले जात आहे. तसेच तिने गोरेपणासाठी देखील तिने काहीतरी ब्युटी ट्रिटमेंट केल्याची चर्चा आहे.

‘बार्बी डॉल’सारखी दिसण्यासाठी केल्या १५ शस्त्रक्रिया, आता आहे मृत्युशय्येवर

नौशिनने मात्र तिने कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली नसल्याचे सांगितले आहे. ‘मी १५ वर्षांपूर्वी जसे दिसायचे तसेच आता दिसेन ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. पंधरा वर्षात माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. २००३मध्ये माझा अपघात देखील झाला होता. त्यावेळी माझ्यावर काही शस्त्रक्रियाही झाल्या होत्या मात्र मी चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची कॉस्मेटीक सर्जरी केलेली नाही’, असे नौशिनने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

SUMMARY : NAUSHEEN ALI SARDAR TROLLED FOR NEW LOOK