कामठा येथील उघड्या डिपीमुळे अपघाताची भिती

71

सामना ऑनलाईन । न्हावाशेवा

उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील कामठा भागात असलेल्या पंचवटी सोसायटीच्या समोरील बाजूस व मनीषा निकेतन बिल्डींग जवळ असलेल्या महावितरणच्या डि.पीला झाकण नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. महावितरणाकडे अनेकवेळा डी.पी.ला झाकण लावण्याची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या 2 वर्षांपासून डी .पी .वरील झाकण नसल्याचे अनेक वेळा वीज अभियंत्यांना नागरिकांनी सांगितले. परंतू उरण येथील वीज अभियंते व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. येथे आजुबाजूला लहान मुले खेळत असतात चुकून लहान मुलांचा हात लागला तर जीवित हानी होण्याची शक्यता आहे. कोणतीही दुर्घटना झाली त्यास वीज वितरण मंडळ जबाबदार राहील. या समस्या कडे गांभीर्याने वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे व डी .पी वरील झाकण लावावे अशी मागणी कामठा येथील नागरिकांनी मागणी केली आहे .

आपली प्रतिक्रिया द्या