नवरात्र स्पेशल रेसिपी- खजूर मिल्क शेक

साहित्य-
२ कप दूध, १२ खजूर, ३ ते ४ काजू, २ हिरवी वेलची, थंड चालत असल्यास १ कप बर्फाचे तुकडे

कृती-
– खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक तुकडे करा.
– काजूचे बारीक तुकडे करून, हिरव्या वेलचीच्या दाण्यांची पूड करून घ्या.
– मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या.
– आता त्यात वेलची पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा मिक्सरमधून फिरवा.
– शेवटी बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
– तयार झालेले खजुराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.