नवरात्र स्पेशल रेसिपी- बटाट्याचे पुडिंग

साहित्य-

५०० ग्रॅम बटाटे, २५० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम खवा, अर्धी वाटी तूप, २-३ वेलदोडे पूड, २ चिमट्या केशर, १ वाटी ओले खोबरे, बदाम, काजू

कृती-

केशर गरम करून खलावे व थोड्या गरम पाण्यात शिजत ठेवावे.
बटाटे उकडून सोलावे व गरमच असताना पुरणयंत्रात घालून बारीक करावे किंवा किसणीने किसावे.
साखरेत अर्धा वाटी पाणी घालून चुलीवर ठेवावे व दोनतारी पाक करावा.
जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की त्यावर बटाट्याचे मिश्रण परतावे.
भिजलेले केशर पाकात घालावे व पाक बटाट्यावर ओतावा.
खवा मोकळा, कुस्करून घालावा मिश्रण सारखे होईपर्यंत सतत ढवळावे.
खाली उतरवून सुबकशा भांड्यात घालावे. वरून वेलदोडे पूड, बदाम, काजू व असल्यास थोडे ओले खोबरे घालावे.