फरार नक्षलवाद्याला गडचिरोलीत अटक

सामना ऑनलाईन । नागपूर

गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या प्रविण उर्फ जेठुराम राऊत (४२) या फरार नक्षलवाद्याला रविवारी अटक करण्यात आली आहे. प्रवीणवर शासनाने २ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.

१९९३ ते १९९९ पर्यंत नक्षलवादी प्रवीण हा चंद्रपूर येथील तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्यानंतर २०००मध्ये जामिनावर सुटल्यावर प्रवीण एटापल्ली दलममध्ये भरती झाला. २००२मध्ये एटापल्ली दलमधून त्याची चामोर्शी दलामध्ये नियुक्ती करण्यात आली होती.