गावकऱ्यांनी केले नक्षल स्मारक उद्ध्वस्त

11


सामना ऑनलाईन । नागपूर

उपविभाग भामरागड अंतर्गत पोलीस मदत केंद्र धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा, मौजा मिडदापली, मौजा गोंगवाडा, मौजा पेनगुंडा या गावात नक्षलवाद्यांनी बांधलेले नक्षल स्मारक येथील ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षानिमित्ताने उत्स्फूर्तपणे एकत्र येत उद्ध्वस्त केले. त्याचबरोबर गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना यापुढे कोणत्याही प्रकारची मदत न करण्याची शपथ यावेळी घेतली.

वर्षानुवर्षे दुर्गम भागातील आदिवासी समाजाला भीती दाखवत बंदुकीच्या जोरावर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी नक्षलवादी हे कुठल्याही प्रकारचा विकास होऊ देत नाहीत. आपली प्रगती साधायची असेल तर यापुढे आपण नक्षलवाद्यांना मदत करता कामा नये अशी भावना उपस्थित २०० ते २५० गावकऱ्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या