नक्षलवाद्यांनी पुकारला गडचिरोली बंद! झाडे तोडून मार्गांवर निर्माण केले अडथळे

146

सामना प्रतिनिधी, गडचिरोली

नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली भागात वाहतूक बंद झाली आहे. नक्षलवाद्यांनी एटापल्ली आलापल्ली मार्गावर झाडे तोडून मार्ग बंद पाडला आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील बससेवेसह इतर वाहतूक बंद झाली आहे.

गुरुपल्लीजवळ वनविभागाची लाखो रुपयांची लाकडेही नक्षल्यांनी जाळली आहेत. 27 एप्रिल रोजी रामको आणि शिल्पा यांच्या चकमकीतील मृत्युच्या निषेधार्थ आज गडचिरोली बंद माओवाद्यांनी घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर जाळपोळ आणि ठिकठिकाणी पत्रकं, फलक लावून लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं. पोलिसांनी अलर्ट जारी केला असून नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या