Lok Sabha 2019 ये बाबाजी कौन है?

सामना प्रतिनिधी । ठाणे 

मोठी राजकीय परंपरा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या वतीने बाबाजी पाटील यांच्या नावाची आज घोषणा होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्वसामान्य मतदार सोडा, पण राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते ये बाबाजी कौन है, असा सवाल करीत आहेत. ज्याचे नावही आम्ही कधी ऐकले नाही त्यांचा प्रचार आम्ही करणार तरी कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ठाणे महापालिकेत फक्त नगरसेवक असलेल्या बाबाजी यांना थेट लोकसभेच्या मैदानात ढकलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ठाणे लोकसभेसाठी गणेश नाईक यांना ऑफर दिली खरी, पण त्यांनी पराभवाच्या भीतीने धुडकावून लावली. त्यामुळे नाइलाजाने आनंद परांजपे यांना तिकीट देऊन घोडय़ावर बसवले. तशी रितसर घोषणा गुरुवारी झाली असली तरी परांजपेंची अवस्था आगीतून उठून फुफाटय़ात अशीच झाली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून पळ काढल्यानंतर त्यांना पुन्हा ठाण्यात बोहल्यावर चढवले. कल्याणमधून ‘सुटका’ झाली असली तरी त्यांना पक्षश्रेष्ठींनी ठाण्यात लटकवले आहे.