मटणावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी

155

सामना ऑनलाईन । तासगाव

तासगाव येथे एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये मटणाचे जेवण संपल्याने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवक व त्यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. अशोक माळी मंगल कार्यालयात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. राडा झाल्याची माहिती मिळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्यानंतरही भांडखोर नगरसेवकांचा धिंगाणा सुरूच होता.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तासगावातील एका युवा नेत्याचा शुक्रवारी वाढदिवस होता. वाढदिवसामुळे या नेत्याला शुभेच्छा देणारी पोस्टरही शहरात झळकत होती. रात्री येथील अशोक माळी मंगल कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी या नेत्याने पार्टी देण्याचे नियोजन केले. रात्री जेवण सुरू झाले. परंतु शेवटी मटण कमी पडल्याने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवक व त्यांच्या समर्थकांमध्ये वाद झाले. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.

आपली प्रतिक्रिया द्या