पुण्यात भाजप 2 वर्षात नापास झाली! राष्ट्रवादीच्या दिलीप बराटेंची टीका

4

सामना ऑनलाईन, पुणे

‘महापालिकेत एकहाती सत्ता  असताना भाजपला एकही प्रकल्प मार्गी लावता आला नाही. केवळ आश्वासने देवून पुणेकरांची फसवणूक भाजपने केली आहे.’ त्यामुळे ‘कोठे नेऊन ठेवले  पुणे माझे’ अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आल्याची टीका  महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे.

महापालिकेत सत्ता स्थापनेला आज म्हणजेच 15 मार्चला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. बराटे यांनी  भाजपच्या सत्ताकाळातील 2 वर्षांच्या कामगिरीचं त्यांच्या पद्धतीने विश्लेषण केलं. यामध्ये भाजप नापास झाल्याचं दिलीप बराटे यांनी म्हटलं आहे. पुण्यात भाजपचे 97 नगरसेवक, आठ आमदार आणि एक खासदार आहेत. गेल्या दोन वर्षात भाजपला तीन वेळा अंदाजपत्रक सादर करण्याची संधी मिळाली.मात्र, या तीनही अंदाजपत्रकात भाजपने घोषणांपलिकडे काही केलं नसल्याचा आरोप बराटे यांनी केला आहे. दोन वर्षात एकही  योजना मार्गी भाजपला मार्गी लावता आली नसल्याचा आरोपही बराटेंनी केला आहे. ज्या प्रकल्पांचे उद्घाटन अथवा काम सुरू झाले आहे ते आघाडीच्या काळातील असल्याचा दावा दिलीप बराटेंनी केला आहे. आहे.

गेल्या दोन वर्षात भाजपला शहरातील वाहतूक, कचरा, पाणी समस्या सोडविण्यात अपयश आहे. नदीसुधारणेचा जायका प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भाजपला पूर्ण करता आलेला नाही. त्याचा फटका पुणेकरांना बसला असून पुणेकरांवर धरणात पाणी असतानाही पाणी कपातीचा समाना करावा लागत असल्याचं बराटे यांचे म्हणणे आहे. केवळ सत्ताधार्‍यांच्या चुकांमुळे महापालिकेचे स्वच्छ शहराचे मानांकनही घसरले असल्याची टीकाही बराटे यांनी यावेळी बोलताना केली. वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, नदीकाठ परिसराचा विकास, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास तसेच ई-लर्निंगसारखे प्रकल्प केवळ सत्ताधारी भाजपच्या नाकर्तेपणामुळे कागदावरच राहिल्याचं बराटेंचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या