राष्ट्रवादी काँग्रेसकडून इफ्तार पार्टीचे आयोजन, पवारांची उपस्थिती

6

सामना ऑनलाईन । मुंबई

मुसलमान समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजीद मेमन, सुनिल तटकरे, नवाब मलिक, धनंजय मुंडे आणि मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

इफ्तार पार्टीवेळी बोलताना शरद पवार म्हणाले, देशातील निवडणुका संपल्या असून देश कोणत्या वाटेवर जाईल, कोणाचे सरकार बनेल हे काही दिवसात स्पष्ट होईल. परंतु कालपासून प्रसारमाध्यमांना एक वेगळेच वातावरण तयार केले आहे. अनेक लोक माझ्याशी संपर्क साधून चिंता व्यक्त करत आहेत. काही मीडिया चॅनेल सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत. परंतु चिंता करू नका, काही दिवसात सर्व काही स्पष्ट होईल.