…आणि महामार्गावर तासभर रखडली शरद पवार यांची गाडी

सामना ऑनलाईन । पुणे

रस्त्यांवर, महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही, अनेकदा तसा अनुभव येतो. परंतु रविवारी अशा वाहतूक कोंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गाडी तब्बल तासभर रखडली.

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण आणि राजगुरुनगर येथे अनेकदा गर्दी असते. नाशिकहून पुण्याकडे येत असताना पवार यांचे वाहन राजगुरुनगर येथे बस स्थानकालगतच्या भागात वाहतूक कोंडीत अडकले. त्यामुळे पोलिसांनी धावपळ सुरू केली नाही. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने पोलिसांची धडपड कामात आली नाही. संध्याकाळी पाच ते सहा तब्बल एकतास पवार यांची गाडी त्या वाहतुकीच्या खोळंब्यातून बाहेर पडू शकली नाही. तासाभरानंतर ही कोंडी फोडण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आणि पवार यांची गाडी पुण्याकडे रवाना झाली.