आमदार मधुसूदन केंद्रे अपघातात जखमी

सामना प्रतिनिधी । पिंपरी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सिंहगड कॉलेजसमोर बुधवारी झालेल्या मोटार अपघातात गंगाखेड (जि.परभणी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मधुसूदन माणिकराव केंद्रे जखमी झाले आहेत. या अपघातात त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले असून, चालक किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताबाबत चालक गणेश पवार यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास आमदार केंद्रे हे त्यांच्या मोटारीतून पुण्याच्या दिशेने जात असताना एका टेम्पोने त्यांच्या गाडीला कट मारला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी समोरच्या ट्रकला जाऊन आदळली. याप्रकरणी अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.