मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

सामना ऑनलाईन, नगर

नगर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र व राज्य सरकारने निवडणूकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकरी, सामान्य नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सगळेच सरकारवर नाराज आहेत असा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला.

जीएसटी मुळे व्यापारी त्रस्त, नोटाबंदीचे नियोजन चुकल्यामुळे अनेक व्यवसाय उद्ध्वस्त झाले. तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली. ३२ हजार कोटीची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा हवेतच विरली. वेगवेगळ्या निकषांचे जीआर काढण्यातच सरकार धन्यता मानतेय. पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात कोणते प्रश्न सोडविले? जिल्ह्यासाठी किती निधी आणला? असे प्रश्न या मोर्चाच्या निमित्ताने विचारण्यात आले.

कर्जमाफीसाठी पैसे नाहीत मात्र बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटीची गुंतवणूक करायची तयारी सरकार करतेय हा काय प्रकार आहे असा सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी विचारला. बुलेट ट्रेनला राष्ट्रवागी काँग्रेसचा विरोध असून शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालीच पाहीजे असं वळसे-पाटील म्हणाले