संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातला गराडा

1

सामना प्रतिनिधी । बीड

पाडवा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला बारामतीत गेलेल्या संदीप क्षीरसागर यांना तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गराडा घातला अन सेल्फीसाठी गर्दी केली. गराड्यातून वाट काढीत त्यांना पवारांच्या भेटीला जावे लागले.

राष्ट्रवादीमध्ये राहून कुटुंबात बंडखोरी करणारे संदीप क्षीरसागर नेहमीच चर्चेत असतात. आज ते पाडवा निमित्त शरद पवारांच्या दर्शनासाठी गेले असता बाहेरच त्यांना युवकांनी गराडा घातला. प्रत्येक कार्यकर्ता संदीप क्षीरसागरासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह धरत होता. राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये संदीप क्षीरसागरची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. चाहत्यांच्या गराड्यातून वाट काढतांना संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या समर्थकांची मोठी कुचंबणा झाली. बारामतीत संदीप क्षीरसागराभोवती निर्माण झालेली युवकांची गर्दी बरंच काही सांगून जाते.