‘नीट’चा निकाल लांबणार

प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रादेशिक भाषेतील प्रश्नपत्रिका लीक होण्याच्या भीतीने यावर्षीच्या नीट (राष्ट्रीय प्रवेश पात्रता परिक्षा) परिक्षेचे इंग्रजी आणि गुजराती विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे सेट तयार केल्याचे स्पष्टीकरण आज सीबीएसई बोर्डाने गुजरात उच्च न्यायालयाला दिले. मात्र सीबीएसई बोर्डाच्या वतीने देण्यात आलेले हे उत्तर समाधानकारक नसल्याचे सांगत न्यायालयाने त्यावर तीक्र नाराजी दर्शवली.

तसेच इंग्रजी प्रश्नपत्रिका देखील लीक होऊ शकतात, असा डोस सीबीएसई बोर्डाला पाजला. यामुळे ‘नीट’चा ७ जूनला जाहीर होणारा निकाल आणखी लांबण्याची शक्यता आहे. नीटच्या निकालावर १२ जूनपर्यंत असलेली स्थगिती गुजरातसाठी कायम राहणार आहे.