मेडिकल कौन्सिलने दिली ‘नीट’ पास होण्याची गुरुकिल्ली

मुंबई – एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश प्रक्रिया (नीट) येत्या ७ मे रोजी होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा मराठीसह आठ भाषांमध्ये देता येणार आहे. विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यातील काही ठरावीक विषयांवरच अधिक लक्ष केंद्रित केल्यास या परीक्षेत चांगले गुण मिळवता येणार आहेत. त्यासंदर्भात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) पुढीलप्रमाणे अभ्यासक्रम जाहीर केला आहे
भौतिकशास्त्र (फिजिक्स) – या विषयातील फिजिक्स वर्ल्ड अ‍ॅण्ड मेजरमेंट, गतीशास्त्र (कायनेमॅटिक्स), लॉज ऑफ मोशन, वर्क एनर्जी अ‍ॅण्ड पॉवर, मोशन ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स अ‍ॅण्ड रिजिड बॉडी, गुरुत्वाकर्षण, प्रॉपर्टीज ऑफ बल्क मॅटर, वायू आणि गतीज ऊर्जेचे तत्व, ऑसिलेशन्स अ‍ॅण्ड वेव्हज् यासंदर्भातील प्रश्‍नांवर अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

रसायनशास्त्र (केमिस्ट्री) – रसायनशास्त्रातील अणू संरचना, वायू आणि द्रवपदार्थ, रसायनांचा समतोल, रसायनांची संरचना, रेडॉक्सचे रिअ‍ॅक्शन, हायड्रोजन, अल्कली, ऑर्गेनिक केमिस्ट्री, इलेक्ट्रो केमिस्ट्री, एन्व्हायरनमेंटल केमिस्ट्री, हायड्रोकार्बन्स, केमिकल कायनेटिक्स, सर्फेस केमिस्ट्री, हालोअल्केन्स आणि हालोएरिनेस, अल्कोहोल, फिनॉल्स, एदर्स, किटोन्स आणि कार्बोक्सिलिक्स अ‍ॅसिड, नायट्रोजन, बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर्स यावर आधारित प्रश्‍न परीक्षेत येऊ शकतात.
जीवशास्त्र (बायोलॉजी) – जगातील जैवविविधता, प्राणी आणि वनस्पतींची संरचना, पेशींची संरचना आणि कार्ये, वनस्पतीशास्त्र, मानवी शरीरचनाशास्त्र, प्रजनन, जनुकीय उत्क्रांती, जीवशास्त्र आणि मानवी कल्याण, जैव तंत्रज्ञान, सजीव सृष्टी आणि पर्यावरण.