ब्रेकअपमुळे तणावाखाली होती नेहा पेंडसे

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठीतील आघाडीची अभिनेत्री नेहा पेंडसे हीने गेल्या वर्षभरात स्वतःला कामात झोकून दिले आहे. नेहाचे व तिच्या बॉयफ्रेण्डचे ब्रेकअप झाल्यामुळे ती प्रचंड तणावात होती. त्यामुळे त्या घटनेतून बाहेर येण्यासाठी नेहा गेले वर्षभर दिवसरात्र काम करत आहे. नेहाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या घटनेविषयी सांगितले.

‘माझा बॉयफ्रेंड एनआरआय होता. त्यामुळे त्याच्यासोबत अमेरिकेला सेटल व्हायचा निर्णय मी घेतला होता. पण अखेरच्या क्षणी त्याने मला नकार दिला. माझ्या बॉयफ्रेंडला वाटायचे की मी अभिनेत्री असल्यामुळे मी एक उत्तम गृहिणी होऊ शकत नाही. मी कायम घरापेक्षा माझ्या करिअरला प्राधान्य देईन. त्यामुळे तो मला सोडून अमेरिकेला गेला. त्याचे आता लग्नही झालेय. पण माझ्या ब्रेकअपमुळे मी खूप तणावाखाली होते. त्यामुळे या गोष्टितून बाहेर पडण्यासाठी मी स्वतःला दिवसरात्र कामात झोकून दिले.’ असे नेहाने मुलाखतीत स्पष्ट केले.