नेहा पेंडसेने दिला एकता कपूरच्या मालिकेला नकार

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी चित्रपटसृष्टि व छोटय़ा पडद्यावरील प्रसिद्ध नायिका नेहा पेंडसे हिने एकता कपूरची आगामी मालिकेत काम करायला नकार दिला आहे. नेहा सध्या तिच्या ‘मे आय कम ईन मॅडम’ या विनोदी मालिकेत व्यस्त आहे. त्यामुळेच तिला एकता कपूरची मालिका नाकारावी लागली.

नेहाने याआधी एकता कपूरच्या ‘मानो या ना मानो’ व ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मी माझ्या करिअरची सुरवात एकता कपूरच्या मालिकेतून केली आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करण्यास मी कायम उत्सुक असते. पण यावेळेस मी ‘मे आय कम ईन मॅडम’ या मालिकेत व्यस्त असल्यामुळे मला तिच्या मालिकेला नकार द्यावा लागला. पण भविष्यात मला पुन्हा तिच्या सोबत काम करायला आवडेल.’ असे नेहाने प्रसारमाध्यमांना सांगितले.