नियोजेन केमिकल्सचे आयपीओ 24 एप्रिल रोजी बाजारात

5
neogen-chemicals-limited

सामना ऑनलाईन । मुंबई

नियोजेन केमिकल्स लिमिटेड कंपनी या ब्रोमिन-बेस्ड व लिथिअम-बेस्ड, स्पेशल्टी केमिकल्सच्या हिंदुस्थानातील एका आघाडीच्या उत्पादकाने एप्रिल 24, 2019 रोजी इक्विटी शेअर्सच्या प्रारंभी समभाग विक्रीला (आयपीओ) सुरुवात करायचे ठरवले आहे. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख बिड/ऑफर सुरू होण्याच्या एक वर्किंग डे अगोदर, म्हणजे एप्रिल 23, 2019 रोजी असेल.

नियोजेन केमिकल्स लिमिटेड प्रारंभी समभाग विक्रीला एप्रिल 24, 2019 रोजी सुरुवात होणार असून प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या प्रति इक्विटी शेअरसाठी किंमतपट्टा 212 रुपये ते 215 रुपये इतके असणार आहे.

किमान बोलीचे प्रमाण 65 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 65 इक्विटी शेअर्सच्या पटीत प्रारंभी समभाग विक्रीला एप्रिल 24, 2019 रोजी सुरुवात व एप्रिल 26, 2019 रोजी विक्री बंद होणार आहे. इक्विटी शेअर्स बीएसई व एनएसई येथे सूचिबद्ध केले जाणार आहेत.