चीनने नेपाळसाठी खुली केली बंदरे

सामना ऑनलाईन । काठमांडू

व्यापारासाठी हिंदुस्थानच्या बंदरांवर अवलंबून असलेल्या नेपाळसाठी चीनने आपली सात बंदरे खुली केली आहेत. चीनची ही हिंदुस्थानविरुद्धची नवी चाल आहे. यापुढे नेपाळला व्यापारासाठी हिंदुस्थानवर अवलंबून राहावे लागणार आहे.

हिंदुस्थानच्या शेजारी राष्ट्रांना आपल्याकडे वळविण्याची खेळी चीनकडून नेहमीच केली जाते. काल नेपाळ आणि चीन सरकारच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी व्यापारासाठी चीनची सात बंदरे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे किंवा रस्तेमार्गाने नेपाळमधील व्यापारी त्यांचा माल चीनच्या बंदरांपर्यंत नेऊ शकतील. नेपाळमधील व्यापाऱयांना हिंदुस्थानातील बंदरे जास्त जवळ आणि सोयिस्कर आहेत. काठमांडूपासून चीनमधील सर्वांत जवळेच बंदर 2600 किमी. वर आहे. या बंदराकडे जाणाऱया रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. नेपाळ सरकारला आधी रस्ते बांधावे लागतील असे व्यापाऱयांनी सांगितले.