जिभेने स्वतःचं कपाळ चाटणारा हा भन्नाट माणूस बघितला का?

सामना ऑनलाईन । मुंबई

जीभ नाकाच्या शेंड्याला चिकटवणे फार कमी जणांना शक्य होते. अशी लोकं त्यांची ही भन्नाटगिरी दाखवून भाव खाऊन जातात. मात्र नेपाळमध्ये एक असा माणूस आहे जो त्याची जीभ नाकाचा शेंड्यांपर्यंत नाही तर कपाळापर्यंत पोहोचते. त्याच्या या जगावेगळ्या हरकतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याग्या बहादूर कटुवाल असे त्या व्यक्तीचे नाव असून तो उरलाबारी येथे बस ड्रायव्हर आहे.