नेपाळमध्येही वासनांध बाबाचा पर्दाफाश


सामना ऑनलाईन। काठमांडू

हिंदुस्थानमध्ये धार्मिक कार्याच्या नावाखाली भक्तांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अनेक अध्यात्मिक गुरू तुरुंगवास भोगत असतानाच शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळमध्येही स्वत:ला बुद्धाचा अवतार म्हणवणाऱ्या एका बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. राम बहादुर बोमजन (28) असे या बाबाचे नाव असून त्याच्या आश्रमातून अचानक अनेक महिला गायब झाल्या आहेत.

हा बाबा नेपाळमध्ये भलताच लोकप्रियअसून त्याचे हजारो समर्थक आहेत. हा बाबा २००५ सालापासून नावारुपास आला आहे. बाबा अन्न पाण्यावाचून अनेक महिने ध्यान धारणा करू शकतो असे सांगितले जाते. बाबाला ध्यानमग्न अवस्थेत बघण्यासाठी भाविकांची येथे नेहमी गर्दी होते. तरुणांमध्येही बाबाची क्रेझ आहे. पण गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एक अठरा वर्षीय तरुणीने बाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बाबाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलांच्या आश्रमाबाहेर रांगाच लागल्या होत्या. तर अनेकजणांनी आश्रमात सेवा देण्यासाठी गेलेल्या महिला घरीच परतल्या नसल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून पोलीस व गु्न्हे अन्वेषण विभाग बाबाच्या विरोधात पुरावे गोळा करत असून त्यांच्या हाती अनेक धक्कादायक पुरावे लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान बाबावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा बोद्धी शरवन धर्म संघाने केला आहे. नेपाळच्या setopati.com या वेबसाईटने बाबावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे.