Sacred Games 2 दुसऱ्या सीझनची तारीख ठरली ? नेटफ्लिक्सच्या इन्स्टा पोस्टमुळे चर्चा सुरू

136
sacred-games-2-new

सामना ऑनलाईन । मुंबई

नेटफ्लिक्सवरी लोकप्रिय वेबसीरीज सेक्रेड गेम्स प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली. त्याचा दुसरा सीझन कधी येणार यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नेटफ्लिक्सने दुसर्‍या सीझनची घोषणा केली असून त्याचे टीजरही प्रदर्शित केले होते परंतु प्रदर्शनाच्या तारखेबाबत सस्पेन्स कायम होता. आता पुन्हा नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केली आहे. यामुळे या वेबसिरीजचा दुसरा भाग केव्हा प्रदर्शित होणार याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.


View this post on Instagram

25 din mein school shuru hone wala hain.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

सध्या लहान मुलांचा चेहरा बनवून टाकण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू आहे. नेटफ्लिक्सने कुकू, काटेकर, बंटी आणि अंजली या चौघांचा तसा फोटो इन्स्टाग्रामवर टाकून 25 तारखेला शाळा सुरू होईल असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये म्हटल्याप्रमाणे 25 दिवस 15 जूनला पूर्ण होत आहेत. यावरून या सिरीजची वाट पाहणाऱ्यांनी 15 जूनला दुसऱ्या भागाला सुरुवात होईल असा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या