इस बार तो भगवान खुद को भी नही बचा सकता!


सामना ऑनलाईन । मुंबई

सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. नेटफ्लिक्सने या शोच्या दुसर्‍या सीझनची घोषणा केली आहे. 25 दिवसांत काय होणार? त्रिवेदी का वाचणार? ताबूत काय असतो? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे या सीझनमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत. शुक्रवारी दुसर्‍या सीझनचा टीझर झळकला आणि अवघ्या काही तासांतच हजारो शेअर्स आणि लाईक्स मिळाले तर लाखाहून अधिक लोकांनी हा टिझर पाहिला आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा टिझर पोस्ट केला आहे.

सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, जितेंद्र जोशी, गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, सुरवीन चावला, नीरज काबी, कुब्रा सेट, जतिन शर्मा, शालिनी वत्स अशा कलाकारांची फौज असलेला सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन खूपच गाजला होता. विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी हा भाग दिग्दर्शित केला होता. आता दुसर्‍या सीझनमध्ये काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘तुम्हे लगता है भगवान सबको बचा लेगा? इस बार तो भगवान खुदको भी नही बचा सकता! या नव्या डायलॉगची भर दुसर्‍या सीझनमध्ये पडली आहे.