‘प्रभो शिवाजी राजा’ अॅनिमेशनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

3

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या अॅनिमेशनपटांचा जमाना आहे. रंगसंगती आणि कल्पनाविष्कारामुळे आबालवृद्धांना अॅनिमेशनपट आवडतात. काही चित्रपट काल्पनिक असतात तर काही चित्रपट इतिहासावर आधारित असतात. पण अॅनिमेशनपट मराठीत पाहायला मिळाल्यावर मराठी प्रेक्षकांना भन्नाट आनंद होतो. मराठी प्रेक्षकांच्या आवडी-निवडीचा विचार करून लवकरच त्यांना एक विशेष भेट मिळणार आहे.

गणराज असोसिएट्स प्रस्तुत ‘प्रभो शिवाजी राजा’ हा आगामी अॅनिमेटनपट आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. हा अॅनिमेशनपट छत्रपती शिवाजी महाराजांवर असणार आहे. महाराजांचं कर्तृत्व या निमित्ताने अॅनिमेशन रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इनफिनिटी व्हिझ्युअल आणि मेफॅक निर्मित आणि निलेश मुळे दिग्दर्शित ‘प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेटेड चित्रपटाचे लेखन समीर मुळे यांनी केले आहे तर पटकथा निलेश मुळे यांनीच लिहिली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

पाहा या चित्रपटाचं मोशन पोस्टर-