फेसबुकचं युजर्ससाठी नवीन फीचर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फेसबुकने सातत्ताने आपल्या युजर्सचा विचार करून त्यांच्या गरजेनुसार नवीन फीचर दिले आहेत. फेसबुक सध्या त्यांच्या मोबाईल अॅपसाठी नव्या फीचरची चाचणी करत आहे. फेसबुकच्या नवीन फीचरच्या माध्यमातून यूजर्स फेसबुक पोस्टमधील मजकूर व्हॉट्सअॅपवरही शेअर करू शकतील अशी माहिती समोर येत आहे. काही यूजर्स हे नवीन फीचर फेसबुक अॅपवर सध्या वापरत आहेत. याबाबतची अधिकृत माहिती फेसबुकने दिलेली नाही.

नवीन फीचरमध्ये शेअर बटनावर टॅप करुन ‘सेंड इन व्हॉट्सअॅप’ हा पर्याय निवडून तुम्ही थेट फेसबुकवरील फोटो किंवा व्हिडीओ व्हॉट्सअपवर शेअर करता येणार आहे. सेंड इन व्हॉट्सअॅप हा पर्यान निवडल्यानंतर एक लिंक तुम्हाला दिसेल ती लिंक तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता.