सनी लिओनी झाली आहे ‘ट्रिपी ट्रिपी’.. 

सामना ऑनलाईन । मुंबई
बादशाहो या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत पिया मोरे या गाण्यावर नृत्याचे जलवे दाखवणारी सनी लिओनी आता पुन्हा एकदा आयटम साँग करणार आहे. संजय दत्त अभिनित भूमी या आगामी चित्रपटात ती ट्रिपी-ट्रिपी या गाण्यावर नाचताना दिसणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक उमंग कुमार यांनी ट्विटर हँडलवरून ही बातमी दिली आहे. या गाण्यातला सनीचा लूकही व्हायरल झाला असून त्यात सनी संपूर्णपणे दागिन्यांनी मढलेली दिसत आहे. सनीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या गाण्याच्या चित्रीकरणाची एक झलक शेअर केली आहे. अद्याप हे गाणं प्रदर्शित झालेलं नसलं तरी सनीमुळे गाण्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.  या गाण्याला सचिन-जिगर यांनी संगीतबद्ध केलं असून प्रिया सरैया आणि गणेश आचार्य यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

 

So much fun shooting for @bhoomithefilm today!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on