दुष्काळावर मात करण्याचा मंत्र देणारा ‘पाणीबाणी’ मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला

279

सामना प्रतिनिधी । बीड

दुष्काळावर कशी मात करायची हे सांगणारा डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेतून पाणी बाणी नावाचा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. मकरंद अनासपुरे यांची मुख्य भूमिका यात असणार आहे.

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. ग्रामीण भागामध्ये परिस्तिथी गंभीर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांना चारा मिळावा यासाठी लोक वणवण फिरताना दिसत आहेत. यासोबतच बऱ्याच गावांमध्ये लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या तत्वावर कामे होताना दिसत आहे. याच विषयास अनुसरून दुष्काळावर मात कशी करावी, एकजुटीने गावच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा आणि यासोबत गावांमध्ये वेगवेगळे प्रसंग यावर आधारित डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेतून “पाणीबाणी” नावाचा मराठी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. याची संकल्पना आणि पटकथा ही डॉ.पुरुषोत्तम भापकर यांची आहे.

या चित्रपटाला उत्तम असे संगीत अतुल दिवे यांनी दिले आहे. अतुल दिवे हे या चित्रपटाचे निर्माते आणि गायक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रजोत कडू आणि सदानंद दळवी यानी केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार मकरंद अनासपुरे तसेच तेजा देवकर आणि रवींद मंकणी हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपट हा संभाजीनगर जिल्ह्यात चित्रित करण्यात आला आहे. सुंदर अशी कथेची रचना, काळजाला भिडणारे संगीत आणि उत्कृष्ट असा अभिनय या सर्व गोष्टीमुळे प्रेषक पूर्णपणे यात गुंतून जातात. यासोबत बीड जिल्ह्यातील एक तरुण कलाकार रणजित पाटील या चित्रपटातून प्रथम मराठी चित्रपट श्रुष्टीत पदार्पण करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या