मायक्रोचीप शोधणार शरीरातील आजार!

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

शरीरातील रोगांचं निदान करण्यासाठी वैज्ञानिकांनी एक छोटी चीप तयार केली आहे. या चीपला गोळीप्रमाणे गिळता येणार आहे. त्यामुळे शरीरातील रोगांची माहिती मिळण्यास आणि त्यावर योग्य उपचार करण्यास मदत होईल असा दावा संशोधकांनी केला आहे. या सिलिकन चीपला ATOMS (अड्रेसेबल ट्रांसमिटर्स ऑपरेटेड ऐज मॅग्नेटिक स्पिन्स) नाव देण्यात आलं आहे.

या चीपमुळे रुग्णाच्या आजारपणाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या चीपला औषध सोडण्याचे निर्देशही दिले जाऊ शकतात. या चीपचं शरीरातील स्थान अचूकपणे सांगता येणं शक्य आहे, जे सध्याच्या उपकरणांमध्ये शक्य नाही. कंलिफोर्निया इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीचे प्रोफेसर अजिता इमामी यांनी सांगितलं की, आम्हाला छोटे उपकरण तयार करायचे आहेत जे शरीरात जाऊन समस्याचा शोध घेऊ शकेल. हे नवं उपकरण एमआरआयच्या सिद्धांतांवर काम करत आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरातील अॅटमची माहिती मॅग्नेटीक फिल्डद्वारे होऊ शकते, असेही सांगण्यात आलं.