ओह नो.. आता बॉलिवूडमध्येही ‘जीएसटी’

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या सहा महिन्यापासून हिंदुस्थानात जीएसटीची चर्चा आहे. या नव्या करप्रणालीमुळे सर्वच क्षेत्रात जे बदल घडलेत त्यावर सगळीकडे वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे. बॉलिवूडमध्ये या जीएसटीमुळे मोठा फरक पडलाय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मर्सल या चित्रपटातल्या जीएसटीवरच्या काही संवादामुळे बराच गदारोळ उठला होता. आता याच नावाने एक चित्रपट येऊ घातला आहे.

gst-movie-poster

सारिका एस सेन्जोत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून जीएसटी या चित्रपटाचे पोस्टरही इतर चित्रपटाच्या पोस्टरपेक्षा वेगळं आहे. या पोस्टरमुळे अनेक प्रेक्षक या चित्रपटाकडे आकर्षिक होत आहेत. जीएसटी म्हणजे “गलती सिर्फ तुम्हारी” असे या चित्रपटाच नाव असून या चित्रपटाची कथा ही मनोरंजक पद्धतीने मांडलेली एक सूडकथा आहे. चित्रपटाच संगीत साहिल रय्यानने दिले असून ते या चित्रपटाच वैशिष्ट्य ठरेल. सारिका यांना या चित्रपटाच्या यशाची खात्री आहे. सूर्यकांत त्यागी दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रदर्शन ही बिग कर्टसचे शकील हाशमी करत आहेत. जीएसटी (गलती सिर्फ तुम्हारी) हा चित्रपट १७ नोव्हेंबर ला संपूर्ण देशभर प्रदर्शित होत आहे.