फेसबुक मैत्रीचा ‘फेसबुकवाला लव’ येत्या 14 फेब्रुवारीला


सामना ऑनलाईन । मुंबई

फेसबुक आज सगळ्या तरुणाईसाठी मौजमजा मस्ती आणि प्रेमासोबतच आयुष्यभराचा जोडीदार शोधण्याचे ठिकाण बनले आहे. फेसबुकचे हेच वैशिष्ट्य घेऊन तयार झालेला हा हिंदी चित्रपट “फेसबुक वाला लव“ चे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे, हा चित्रपट युवा प्रेक्षकांना विशेष आकर्षित करणारा असून या चित्रपटात ते सर्व आहे जे आजच्या युवकांना आपलेस वाटेल, त्यांची स्वत:ची गोष्ट वाटेल. बरोबरीने हा चित्रपट कौटुंबिक चित्रपट आहे.

आजच्या पिढीची धमाल मस्ती चित्रित करणाऱ्या या चित्रपटात राहुल बग्गा आणि नैस्सी ठक्कर मुख्य भूमिकेत आहेत. कॅचर्स मीडिया सोल्यूशन या निर्मिती संस्थेअंतर्गत टिंकू कुरेशी यांनी या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन नारायण के. साहू यांनी केली आहे. हा आजच्या प्रेमाचा, फेसबुक मैत्रीचा “फेसबुक वाला लव“ येत्या 14 फेब्रुवारीला संपूर्ण देशात प्रदर्शित होत आहे.