‘साहो’च्या नवीन पोस्टरमध्ये प्रभासचा अॅक्शन अंदाज, गुरुवारी टिझर येणार

91

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सुपरस्टार प्रभासचा आगामी बहुचर्चीत चित्रपट ‘साहो’चे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये प्रभासचा अॅक्शन अंदाज दिसत आहे. पोस्टरमध्ये प्रभास बॉम्बस्फोट, उडणाऱ्या गाड्यांमधून वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. या पोस्टरमुळे चित्रपटात दमदार अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रभासने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘तुम्ही सर्व साहोच्या दुनियेसाठी सज्ज आहात ना. उद्या चित्रपटाचे टिझर येत आहे’, असे कॅप्शन प्रभासने या फोटोसोबत दिले आहे. या पोस्टरवर प्रभास वेगाने बाईक पळवताना दिसत आहे आणि त्याच्या पाठी बॉम्बस्फोट, उडणाऱ्या गाड्या आणि आग दिसत आहे.

‘साहो’ चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये शूट केला जात आहे. सुजीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 15 ऑगस्टला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या