नकटी घेतेय निरोप… ‘ही’ मालिका येणार भेटीला

सामना ऑनलाईन । मुंबई

झी मराठी वरील नकटीच्या लग्नाला ही आवडती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत प्राजक्ता माळी म्हणजेच ‘नुपुर’चे लग्न तिच्या आत्येभावाशी नीरजशी ठरलेले असते परंतु नीरजला दुसरी मुलगी पसंत असते. त्यामुळे नुपुरशी लग्न करण्यासाठी मालिकेत दर आठवड्याला नवनवीन सेलिब्रेटीजची एन्ट्री होत असते. ‘नात्कीच्या लग्नाला यायचं हां’ ह्या मालिकेमध्ये प्राजक्ता माळीसोबत संजय सुगावकर, पूर्णिमा तळवलकर, असित रेडीज, वर्षा दांडले, शकुंतला नरे, रागिणी सामंत, सोनाली पंडित, आनंद कारेकर, अभिनय सावंत, अभिजित आमकर हे कलाकार काम करत आहेत.

‘नकटीच्या लग्नाला यायचं हां’ या मालिकेची निर्मिती अतुल केतकर आणि अपर्णा केतकर करत असून तसेच मालिकेचे दिग्दर्शन गौतम कोळी हे करत आहेत. मालिकेमध्ये नुपुरला लग्नासाठी बघायला अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, शशांक केतकर, अवधूत गुप्ते, सिद्धार्थ चांदेकर, ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ मेनन असे अनेक सेलिब्रेटी येऊन गेलेत.

नकटीच्या लग्नाला यायचं हां’ या मालिकेच्या जागी झी मराठीच्या प्रेक्षकांना भेटीला कार्तिक कृष्ण पंचमीपासून ‘हम तो तेरे आशिक है’ हि नवीन मालिका येणार आहे. नवीन मालिकेची जहिरात हि टीव्ही वर होत आहे. ही मालिका सुद्धा नकटीच्या लग्नालाच्या वेळेतच म्हणजे ८ नोव्हेंबर पासून बुधवार ते गुरुवार रात्री १० वाजता दाखवण्यात येणार आहे. शेजाऱ्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा इर्ष्येने हेवा बाळगणं हा प्रत्येकाचाच स्वभावगुण, मग शेजाऱ्याची ‘ती’ गोष्ट नजरेतून सुटेलच कशी..!! कोणती..? असे नवीन मालिकेचे म्हणणे आहे. शेवटी नकटीच लग्न होतं का?? आणि ते होतं तर कोणासोबत होतं?? हे पाहण गमतीच ठरेल…