पाहा अमरेंद्र बाहुबलीची पहिली झलक

1

सामना ऑनलाईन । मुंबई

बहुचर्चित ‘बाहुबली २’ प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातल्या एका महत्त्वाच्या गाण्याची झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘बाहुबली २’मधील ‘साहोरे बाहुबली’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये पार्श्वसंगीताच्या रुपात याच गाण्याचा वापर करण्यात आला आहे.

आपल्या पहाडी आणि दमदार आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या गायक दलेर मेहंदीने ‘साहोरे बाहुबली’ या गाण्याला आवाज दिला आहे. कटप्पाने ज्याला मारलं तो अमरेंद्र बाहुबली नेमका कसा होता ते या गाण्यातून प्रेक्षकांना दिसत आहे. अमरेंद्र बाहुबलीवर असणारं त्याच्या जनतेचं प्रेम, तो करत असलेले पराक्रम, त्याचं साम्राज्य या साऱ्याची सांगड ‘साहोरे बाहुबली’मध्ये घालण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ज्या भव्यतेसाठी राजामौलींच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत त्याचा हलकासा अंदाज या गाण्यातून येत आहे.

पाहा साहोरे बाहुबली-