सुशांत म्हणतोय क्रितीला.. ‘इक वारी आ…’

1

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा आगामी चित्रपट ‘राबता’ या चित्रपटातलं नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे. इक वारी आ असे या गाण्याचे बोल आहेत. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणं लिहीलं असून संगीतकार प्रीतम यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. अरिजित सिंग या आघाडीच्या गायकाने हे गाणं स्वरबद्ध केलं आहे.

या चित्रपटात सुशांतसोबत अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होते. त्या ट्रेलरवरून ही पुनर्जन्मावर आधारित प्रेमकथा असल्याचं दिसून येत आहे. दिनेश विजन निर्मित- दिग्दर्शित ‘राबता’ ही एक प्रेमकहाणी आहे. टीसीरिज आणि मॅडॉक फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘राबता’ येत्या ९ जून रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा इक वारी आ हे गाणं-