‘जुडवा-२’ मधलं ‘उँची है बिल्डिंग’ पाहिलंत का?

सामना ऑनलाईन । मुंबई

सलमान खानच्या जुडवामधलं एक सुपरहिट गाणं आठवतंय का? ‘उँची है बिल्डिंग..’ असे बोल असलेलं अन्नु मलिक यांच्या आवाजातलं ते गाणं आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. वरुण धवनच्या आगामी ‘जुडवा-२’मध्येही जुन्या जुडवामधली काही गाणी घेण्यात आली आहेत. त्यात या गाण्याचा समावेश असून या नवीन गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. अन्नु मलिक आणि नेहा कक्कर यांच्या आवाजातलं नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या गाण्याचे बोल देव कोहली यांचे असून अन्नु मलिक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित जुडवा-२ येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा गाण्याचा व्हिडिओ-