‘मुरांबा’चा गोडवा कानात उतरवणारं शीर्षक गीत प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई

अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मुरांबा’ चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा मुरांबा फक्त जिभेला नाही तर कानालाही गोड लागतोय. ‘मुरांबा’ चित्रपटाचं शीर्षक गीत अभिनेत्री मिथिला पालकर आणि जसराज जयंत जोशी यांनी गायलं आहे, तर संगीत हृषिकेश दातार, सौरभ भालेराव आणि जसराज जयंत जोशी यांनी दिलं आहे.

दशमी स्टुडिओज, हयुज प्रॉडक्शन्स, प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुरांबा’ या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनाची धुरा वरूण नार्वेकर यांनी सांभाळली आहे. अमेय आणि मिथिलाचा ‘मुरांबा’ २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पाहा मुरांबाचं हे शीर्षक गीत-