मुंबईतील पुलांचे आयुष्य वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार!

18

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईत बांधण्यात येणारे पादचारी, वाहतूक आणि रेल्वे पुलांचे आयुष्यमान दीर्घकालीन असावे यासाठी मुंबई महापालिका, रेल्के प्रशासनाने अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा कापर करावा. सध्या ज्या भागातील पूल, रस्ते वाहतुकीस बंद आहेत त्याबाबत व पर्यायी मार्गांची माहिती देण्याकरिता मोबाईल ऍप तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

‘वर्षा’ निकासस्थानी मुंबईतील धोकादायक पुलांच्या कामाबाबत आढावा घेण्यासाठी बैठक झाली. याकेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशीष शेलार, राज पुरोहित, अमित साटम, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. विविध प्रशासकीय यंत्रणांमार्फत मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पुलांचे काम केले जाते. अशा वेळी हे बांधकाम केवळ 30 ते 35 वर्षे टिवणारे नसावे तर त्याहून अधिक काळ ते टिकतील अशी रचना करावी त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत एकूण 344 पूल असून त्यातील 314 पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील आहेत तर 30 पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील आहेत. त्यातील 29 पूल स्ट्रक्चर ऑडिटनंतर बंद करण्यात आले आहेत. 92 पूल सुस्थितीत असून 116 पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात येत आहे, तर 67 पुलांची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती सुरू आहे. मध्य रेल्वेमार्फत 199 पुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत मध्य रेल्वेमार्फत 68 तर पश्चिम रेल्वेमार्फत 32 पादचारी पूल नव्याने बांधण्यात आले आहेत.

रस्त्यांची माहिती देणारे ऍप तयार करा

सध्या मुंबईतील जे रस्ते, पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत त्याबाबत नागरिकांना माहिती होईल यासाठी जागोजागी मार्गदर्शक फलक लावावेत. पुलाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत माहिती फलक लावून नागरिकांना द्यावी. तसेच दुरुस्तीमुळे ज्या पुलावरून अथवा रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी मोबाईल ऍप तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  ज्या भागात ठरावीक बाजारपेठेच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते तेथे ठरावीक अंतरावर वाहनतळाची व्यवस्था करावी. तेथून नागरिकांना बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी वाहतुकीची सुविधा निर्माण करावी जेणेकरून वाहतूककोंडीचा ताण कमी होण्यास मदत होईल. आवश्यकता भासल्यास बेस्ट बसच्या प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या